डेन्मार्कमधील गोळीबारात ३ जणांचा मृत्यू : आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता  

प्रातिनिधिक छायाचित्र

कोपनहेगन (डेन्मार्क) – डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील एका मॉलमध्ये (मोठ्या व्यापारी संकुलामध्ये) २२ वर्षीय तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले. पोलिसांनी गोळीबार करणार्‍या तरुणाला अटक केली असून त्याचे नाव एथनिक डेन आहे. हे आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.