ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन त्यागपत्र देणार

  • ४१ मंत्र्यांचे सामूहिक त्यागपत्र !

  • लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्रीमंडळात स्थान दिल्यामुळे मंत्र्यांचा आक्षेप !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देणार आहेत. त्यांच्या हुजूर पक्षाच्या ४१ मंत्र्यांनी सामूहिक त्यागपत्र दिल्यानंतर जॉन्सन यांच्यावर त्यागपत्र देण्यासाठी दबाव वाढला आहे.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी मंत्रीमंडळात सहभागी करून घेतल्याने वाद उफाळून आला होता. त्यानंतर सरकारमधील एकामागून एक मंत्र्यांनी त्यागपत्र देण्यास प्रारंभ गेला. प्रथम अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद या मंत्र्यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. पंतप्रधान जॉन्सन यांनी त्यागपत्र दिल्यानंतर पुन्हा निवडणुका घेण्याची घोषणा केली नाही, तर त्यांच्या जागेवर ऋषी सुनक यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास ते भारतीय वंशांचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान होऊ शकतात.

संपादकीय भूमिका

भारतात गुन्हेगार लोकप्रतिधींच्या विरोधात अन्य लोकप्रतिनिधी कधी आवाज उठवतांना दिसत नाहीत; कारण बहुतांश जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुन्हेगारीशी संबंधित असतात !