ऑॅस्लो (नार्वे) येथे कुराण जाळणार्‍या नेत्याच्या वाहनावर मुसलमान महिलांकडून आक्रमण

ऑस्लो (नॉर्वे) – येथे इस्लामला विरोध करणारी संघटना ‘स्टॉप द इस्लामायझेशन ऑफ नॉर्वे’च्या लॉर्स थोर्सन या नेत्याच्या वाहनाला अन्य एका वाहनाद्वारे जाणीवपूर्वक ठोकर मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या ठोकरीमुळे ५ जण घायाळ झाले असून यातील एकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेच्या काही वेळापूर्वीच लॉर्स थोर्सन यांनी मुसलमानांच्या भागात जाऊन कुराणाची प्रत जाळली होती. त्यानंतर ही ठोकर मारण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघा मुसलमान महिलांना अटक केली आहे. त्यांनीच ही ठोकर मारली होती. (धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कायदा हातात घेणार्‍या मुसलमान महिला ! हिंदु कायद्याद्वारेही धर्माचा अवमान करणार्‍यांना विरोध करत नाहीत ! – संपादक)