सहन न करण्याजोग्या गोष्टी कधीही सहन करू नका !

नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचे हिंदूंना आवाहन

नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – जर धर्मनिरपेक्षता म्हणजे लांगूलचालन असेल, तर तेथे कायद्याला महत्त्व रहात नाही. भारत आणि हिंदु मित्रांनो, तुमच्या मूल्यांचे रक्षण करा. सहन न करण्याजोग्या गोष्टी कधीही सहन करू नका. लोकशाही आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण होणे आवश्यक आहे’, असे ट्वीट नेदरलँड्स येथील खासदार आणि ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक गीट विल्डर्स यांनी केले. हिंदूंच्या होणार्‍या हत्या आणि अन्य आघात यांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी वरील ट्वीटद्वारे हिंदूंना आवाहन केले.
अन्य एका ट्वीटमध्ये भारताचे कट्टर समर्थक असलेले गिल्डर्स म्हणाले की, इस्लामच्या मते, ‘हिंदू हे ‘काफिर’ असून ते अल्लावर विश्‍वास ठेवत नाहीत. त्यांना नष्ट केले पाहिजे.’ हे पूर्णत: अस्वीकारार्ह आहे. धर्मनिरपेक्षतावादाच्या आडून अशी निरंकुशता अथवा शिरच्छेद यांना पाठीशी घातले जाऊ शकत नाही. न्यायाधिशांनी शरियत कायद्याला विरोध केला पाहिजे आणि नूपुर शर्मा यांचे समर्थन केले पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाच्या नूपुर शर्मा यांच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणांवर ट्वीट !

अन्य एका ट्वीटद्वारे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे नाव न घेता गिल्डर्स म्हणाले की, जर तुम्ही केलेल्या निरीक्षणांचे तालिबानसारखी इस्लामी संघटना समर्थन करत असेल, तर तुम्ही हे लक्षात ठेवा की, तुम्ही काहीतरी पुष्कळ चुकीचे बोलला आहात.