‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

उर्दू ही राज्य किंवा राष्ट्र भाषा नाही. तरीही असे फलक छापून ते तहसील कार्यालयात लावण्यामागील सरकारचा हेतू काय आहे, हे जनतेला समजले पाहिजे. याविषयी सरकारने लेखी स्वरूपात आपला खुलासा करावा.

अभ्दिमंडी (जिल्हा संभाजीनगर) येथील गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !

येथील शिवभक्त गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे (वय ७५ वर्षे) यांनी ३ डिसेंबर या दिवशी देहत्याग केला. सनातन परिवार लिंभारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. पू. आप्पा लिंभारे यांना १२ वर्षांपूर्वी दत्तगुरूंनी दृष्टांत दिला.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी नगर येथे निवेदन

केंद्र सरकारने देशात लव्ह जिहाद रोखण्यासाठी ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करावी. लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी केंद्र अन् राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा गठीत करावी. लव्ह जिहादच्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेंच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या विरोधात पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

‘सरकार स्थिर रहावे’, असे वाटत असल्यास काँग्रेस नेतृत्वावर बोलणे टाळावे ! – अधिवक्त्या यशोमती ठाकूर, महिला आणि बाल विकासमंत्री

काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असे सूचक ‘ट्वीट’ काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

पत्रकार समीर देशपांडे यांचा कोरोना काळातील कामगिरीविषयी सन्मान

दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला.

सातारा येथे अतिक्रमण विभागाची कारवाई

काही अतिक्रमणे सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ४ डिसेंबर या दिवशी हटवली.

घटनापिठासमोरील सुनावणीसाठी अधिवक्त्यांच्या समन्वय समितीची घोषणा

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांनी ५ अधिवक्त्यांची समन्वय समिती घोषित केली आहे.

काणकोण आणि नागोवा येथून अमली पदार्थ कह्यात

काणकोण पोलिसांनी गालजीबाग, काणकोण येथे एका कारवाईत मूळचा पश्‍चिम बंगाल येथील एक नागरिक त्रिदीप नंदी याच्याकडून ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले.

पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणार्‍या सार्वजनिक बँका तपशील लपवून ठेवत आहेत ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

सर्वसामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यावर त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावणार्‍या अधिकोषांनी कर्ज न फेडणार्‍या थकबाकीदारांची माहिती गोपनीय ठेवणे अन्यायकारकच आहे.