लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी नगर येथे निवेदन

हिंदुत्वनिष्ठांना असे निवेदन का द्यावे लागते ?

नगर – हरियाणातील निकिता तोमर हत्या प्रकरणासारखी हत्याकांडे देशभरात घडत आहेत. केंद्र सरकारने देशात लव्ह जिहाद रोखण्यासाठी ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करावी. लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी केंद्र अन् राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा गठीत करावी. लव्ह जिहादच्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे नगर येथील नायब तहसीलदार आर्.जी. दिवाण यांच्याकडे देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री संतोष गवळी, परमेश्‍वर गायकवाड, किशोर हिंगे, अभय मते, गणेश हिंगे आणि ज्ञानेश्‍वर हिंगे उपस्थित होते.