केजरीवाल शासन देहली येथे कोकणी अकादमी स्थापन करणार

भारतातील विद्यार्थ्यांना भाषेसंबंधी ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने येथील केजरीवाल शासनाने देहलीमध्ये कोकणी अकादमी चालू करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. देहली मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

धान्य खरेदीसाठी १ लाख बारदाने शासनाने पुरवावीत ! – सतीश सावंत

वर्ष २०२०-२१ च्या धान्य खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची (पोत्यांची) आवश्यकता आहे. शासनाने ही बारदाने पुरवावीत, अशी मागणी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

कोरोना लसीकरणात कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाविषयीची रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याप्रसंगी भेट देऊन रुग्णालयातील सिद्धतेचा आढावा घेतला.

नगर येथील तत्कालीन नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रहित करण्याचा निर्णय संभाजीनगर खंडपिठाने वैध ठरवला !

नगर महापालिकेचे श्रीपाद शंकर छिंदम यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले होते.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्‍न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आला आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करावे, अशी मागणी आहे. यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.

महिला पोलिसावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या चौघांविरोधात गुन्हा नोंद

जिथे महिला पोलीसच असुरक्षित असतील, तिथे सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल ?

काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर संभाजीनगर नावाचा वापर चालू !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय ट्विटरवर काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.

हुबळी येथे होत आहे जगातील सर्वांत मोठा रेल्वे फलाट; युद्धपातळीवर काम चालू

हुबळी रेल्वे फलाट जगातील सर्वांत अधिक लांबीचा फलाट होणार

सांगलीत एफ्आरपी आंदोलनाच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये झटापट

आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन स्थगित केले.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या सोडती काढण्याच्या निर्णयाप्रकरणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना न्यायालयाची नोटीस

१५ जानेवारीस राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.