बार्शी (जिल्हा सोलापूर) – शहरातील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातून सेवा संपवून घरी जातांना महिला पोलीस कर्मचारी रेश्मा सुतार यांच्यावर बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील शेलगावजवळ चार जणांनी प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (जिथे महिला पोलीसच असुरक्षित असतील, तिथे सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल ? – संपादक)
महिला पोलीस रेश्मा सुतार दुचाकीवरून घरी जातांना दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले. त्या वेळी ते कर गुन्हा नोंद, माझ्या मेव्हण्यावर गुन्हा नोंद करतेस का, कर, असे म्हणून तेथून निघून गेले. त्यानंतर दुसर्या दोघांनी येऊन आज तू घरापर्यंत कशी पोचते ते बघतो, तुला मी जिवंत ठार मारतो, असे म्हणत धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र रेश्मा सुतार यांनी वार चुकवला. रस्त्यावर अन्य वाहने येत आहेत, हे पाहून दोघेही तेथून पळून गेले.