सांगली, ८ जानेवारी – उसाला एकरकमी एफ्आरपी मिळावी, या मागणीसाठी सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दत्त इंडिया संचालित वसंतदादा पाटील साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारखाना प्रशासनाकडून १० दिवसांमध्ये एकरकमी एफ्आरपी देण्याचे आश्वासन देण्यात आले. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन स्थगित केले.