Chardham Yatra Huge Crowd : चारधाम यात्रेच्या दुसर्‍याच दिवशी यमुनोत्रीच्या चिंचोळ्या ४ कि.मी. मार्गावर प्रचंड गर्दी

समुद्रसपाटीपासून १० सहस्र ७९७ फूट उंचीवर असलेल्या यमुनोत्री मंदिरापर्यंतचा हा मार्ग ! एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला खोल खंदक. गर्दीत लहान मुले, वृद्ध, महिला आणि शेकडो खेचर होते. एक खेचरही भरकटले असते, तर सहस्रो लोकांचे जीव अडचणीत आले असते.

पाकव्याप्त काश्मीरमधील हिंसाचारात १ पोलीस ठार !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांकडून सरकार, पाकचे सैन्य आणि पोलीस यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये एका पोलिसाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला, तर एका सैनिकाला मारहाण करण्यात आली.

Isro Tested Liquid Rocket Engine : ‘इस्रो’ने केली ‘लिक्विड रॉकेट इंजिन’ची यशस्वी चाचणी !

लिक्विड रॉकेट इंजिन हे पी.एस्.एल्.व्ही.च्या वरील टप्प्याचे इंजिन आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे इस्रोला इंजिनमधील भागांची संख्या १४ वरून १ वर आली. त्यामुळे ९७ टक्के कच्च्या मालाची बचत तसेच उत्पादनासाठीचा एकूण वेळ ६० टक्क्यांनी अल्प  झाला !

Devaraje Arrested : भाजपचे नेते देवराजे यांना अटक

एका महिलेनेही देवराजे गौडा यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

दिवसभरातील महत्वाचे थोडक्यात : नाशिक येथे अवेळी पावसाचा तडाखा, लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…

नाशिकमध्ये ११ मे या दिवशी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वार्‍यासह पाऊस आला. पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

हिंदु राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या ! – आमदार नितेश राणे, भाजप

पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

मध्यप्रदेश येथून अपहरण केलेल्या बालकाची पनवेल येथे सुटका !

या प्रकरणी एक शिक्षक, त्याची पत्नी, एक माजी विद्यार्थी आणि दोन संशयित महिला यांना पोलिसांनी अटक केली आहे. या बाळाची २३ लाख रुपयांना विक्री करण्यात आली होती.

आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका ! – नवनीत राणा, भाजप

मी ओवैसींना आव्हान देते, मी भाग्यनगरला येते मला रोखून दाखवा. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले आहे.

पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्.च्या गाड्या प्रवासी मार्गांवर बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रास !

पी.एम्.पी.एम्.एल्.कडे टप्प्याटप्प्याने ६५० नवीन इ-बस येणार होत्या. या सर्व गाड्या वर्ष २०२१ पर्यंत येणार होत्या. आतापर्यंत ४७३ इ-बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे अजूनही १७७ इ-बस प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.