हुब्बळी (कर्नाटक) – येथील विद्यार्थिनी अंजली अंबीगेर हिच्या हत्येच्या प्रकरणी धारवाड शहराचे पोलीस उपायुक्त एम्. राजीव यांना निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात आणखी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. हुब्बळ्ळी – धारवाड नगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच महिन्याच्या कालावधीत दोन युवतींची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. अंजली अंबिगेर हिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्याविषयी तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती; परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.
Deputy Commissioner of Police suspended in Anjali Ambiger murder case
📍Hubballi, Karnataka
Anjali Ambiger had received death threats and had lodged a complaint with the Police, but they ignored it.
Subsequently, she was murdered, according to allegations made by the family of… pic.twitter.com/e7aGteRUlP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2024
त्यापूर्वी हुब्बळ्ळी येथील नेहा हिरेमठ हिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याच्या आरोपावरून पोलीस उपायुक्त राजीव यांना निलंबित करण्यात आले. गृहमंत्री जी. परमेश्वर हे लवकरच हुब्बळ्ळी येथे भेट देणार आहेत.