सांगली येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा !

लव्ह जिहाद

सांगली, १९ मे (वार्ता.) – येथे १९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी सकल हिंदु समाज संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र काही तांत्रिक आणि इतर कारणांमुळे हा मोर्चा २६ मे या दिवशी काढण्यात येणार आहे. सकल हिंदु समाज संघटनेच्या वतीने या मोर्च्याची सिद्धता चालू आहे.

मुंबई येथील मातंग समाजातील भगिनी कु. पूनम क्षीरसागर आणि कर्नाटक येथील लिंगायत समाजातील भगिनी कु. नेहा हिरेमठ यांच्या क्रूर हत्येचा जाहीर निषेध आणि एकूणच ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपचे आमदार नितेश राणेही उपस्थित रहाणार आहेत.

हा मोर्चा सायंकाळी ५ वाजता झुलेलाल चौक येथून प्रारंभ होणार आहे. दीनानाथ चौक, मारुति चौक, बालाजी चौक, कापडपेठ, स्टेशनचौक मार्गे जाऊन राममंदिर येथे त्याचे सभेत रूपांतर होईल. कु. नेहा हिरेमठ आणि कु. पूजा क्षीरसागर यांच्या हत्येचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण व्हावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालून गुन्हेगारांना लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, ‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी कठोर कायदा करावा, सांगली येथे ‘वक्फ-बोर्ड’ने अवैधरित्या बळकवलेल्या जमिनी महाराष्ट्र सरकारने परत घ्यावात, या तसेच अन्य मागण्या यात करण्यात येणार आहेत.