आग्रा येथील मशिदीत आढळला महिलेचा अर्धनग्न मृतदेह : बलात्कार करून हत्या केल्याचा संशय !

आग्रा (उत्तरप्रदेश) – येथील ताजगंजमधील नागलपाईमा या मशिदीत एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ओळख पटू नये; म्हणून महिलेचे डोके दगडाने ठेचले होते. मृत महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या छायाचित्रावरून तिची ओळख पटली. महिला अर्धनग्न अवस्थेत होती. तिच्यावर बलात्कार झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी सापडलेल्या पर्समध्ये एका मुलाचे छायाचित्र होते. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाचे नाव आमिर खान असल्याचे समजले. पोलीस आमिर खानच्या घरी पोचले. आमिरच्या आईने सांगितले की, आमिरचे छायाचित्र तिनेच महिलेला दिले होते. तिच्या म्हणण्यानुसार, ही महिला मशिदीत काम करत असल्याने ती भूतबाधा करणार्‍यांना ओळखत होती. आमिरच्या आईची इच्छा होती की, त्या महिलेने तिच्या मुलावर काही भूतविष्कार करावे; जेणेकरून त्याला चांगली नोकरी मिळेल.

पोलिसांनी मृत महिलेविषयी माहिती गोळा केली आहे. मृत महिलेचे वय ३५ वर्षे असून तिचे लग्न झाले होते. तिचा नवरा तिला सोडून गेला होता. तिला १५ वर्षांची एक मुलगीही आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत, असे पोलीस अधीक्षक पीयूष कांत यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

अशी घटना मंदिरात घडली असती, तर एव्हना पुरोगाम्यांनी आकाश-पाताळ एक केले असते. आता ही घटना मशिदीत घडल्याने ते काहीही बोलणार नाहीत, याची निश्‍चिती बाळगा !