पुणे येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारच्या धडकेत २ अभियंत्यांचा मृत्यू !

दुर्घटनाग्रस्त पोर्शे कार 

पुणे – येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांग अग्रवाल याने त्याच्या ईव्ही पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. माहिती तंत्रज्ञान अभियंता असलेल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. वेदांत हा रात्री मेजवानी करून भरधाव वेगाने गाडी चालवत होता. या वेळी कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावर त्याने दुचाकीला धडक दिली. मुख्य म्हणजे त्याच्या चारचाकीला वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. वेदांत याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमावाने त्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या कह्यात दिले. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता काही अटी आणि शर्ती यांवर जामीन संमत झाला.