तरुणीच्या ओढणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून भ्रमणसंगणकाची चोरी !

कल्याण रेल्वेस्थानकाजवळील प्रकार !

जळलेली ओढणी 

कल्याण – येथे रेल्वेस्थानकाजवळ आपल्या मित्राला भ्रमणसंगणक (लॅपटॉप) देण्यास जाणार्‍या तरुणीच्या ओढणीवर दोन अनोळखी तरुणांनी ज्वलनशील पदार्थ फेकला. आणि तरुणीच्या डोळ्यांसमोर अंधारी आल्याने तिने डोळे मिटले. याचा अपलाभ घेत भ्रमणसंगणक आणि तिची एक बॅग हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. यात घायाळ झालेल्या तरुणीला रुग्णालयात भरती करण्यात आले. (कल्याण रेल्वेस्थानक हे चोर्‍यामार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे. अशा वेळी येथे पोलीसयंत्रणा तत्पर कधी होणार ? – संपादक) 

ही तरुणी स्पर्धा परीक्षेची सिद्धता करत असून मित्राचा भ्रमणसंगणक तिने अभ्यास करण्यासाठी घेतला होता. या प्रकरणी तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.