4 Islamic State Terrorists Arrested : कर्णावती (गुजरात) विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना अटक

कर्णावती (गुजरात) – गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना कर्णावती विमानतळावरून अटक केली. हे सर्व जण श्रीलंकेचे नागरिक आहेत.

या आतंकवाद्यांची चौकशी केली जात आहे. ते कोणत्या उद्देशाने येथे आले होते ?, याची माहिती घेतली जात आहे. गेल्या वर्षीही गुजरात पोलिसांनी पोरबंदरमधून इस्लामिक स्टेटच्या काही आतंकवाद्यांना अटक केली होती.