राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. यासाठी सरकारने स्वतःची बाजू जोरकसपणे मांडून आंदोलनात घुसलेल्या समाजविघातक घटकांची माहिती समोर आणणे आवश्यक !

शेतकर्‍यांच्या सूत्रांवरून राज्यसभेत गोंधळ घालणारे आपचे ३ खासदार दिवसभरासाठी निलंबित

गोंधळ घालणार्‍या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा विचार नाही ! – केंद्र सरकार

केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

(म्हणे) ‘छत्तीसगडमध्ये भाजपच्या खासदाराकडून माझ्या मृत्यूसाठी यज्ञ !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्‍वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.

बीड येथे ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

तालुक्यातील घारगाव ते अंजनवती या ६ ते ७ किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास शासनाची अनुमती

राज्यातील ऊस गाळप हंगामाचे कारण पुढे करत ३ मासांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती राज्य सरकारने २ फेब्रुवारीला मागे घेतली आहे.

रेल्वेस्थानकात ‘हिंदुस्थान’ लिहिलेली विदेशी शौचालयाची भांडी काढून टाकण्याची मागणी !

हा देशाचा आणि क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. ती त्वरित काढून टाकावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे.