पुणे – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संजू निकुंभ याला न्यायालयाने जन्मठेप आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला द्यावी, असा आदेश देण्यात आला. ६ ऑगस्ट २०१७ ला अल्पवयीन मुलगी निकुंभ यांच्या २ वर्षांच्या मुलीला खेळवत होती. आरोपीने पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने तो निघून गेला; परंतु त्यापूर्वीही ४ ते ५ वेळा निकुंभने मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार केली होती.