चर्होली (पुणे) येथे वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित निर्धार मेळावा !
चर्होली (जिल्हा पुणे) – लोकसभेमध्ये ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. ज्यामध्ये क्रूरकर्मा अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवलेल्या सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीलाही पराभूत केले गेले. म्हणूनच विधानसभेसाठी सतर्क होऊन आपल्याला ‘व्होट हिंदुत्व’ पुढे न्यायचे आहे. पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय, गोवंश जतन, हिंदु राष्ट्राभिमान आणि हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणार्याला विजयी करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वाधिक मताधिक्य मिळालेला उमेदवार म्हणून महेश लांडगे यांचे नाव पुढे आले पाहिजे, असे आवाहन समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले. भाजप महायुतीचे भोसरी मतदारसंघातील उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चर्होली येथील वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित निर्धार मेळाव्यात एकबोटे हे बोलत होते.
एकबोटे पुढे म्हणाले की, ही निवडणूक नेहमीसारखी नाही. मावळ्यांप्रमाणे भूमिका घ्यावी लागेल. आम्ही जातीभेद मानणारे नाही. आम्हाला ‘सर्व हिंदु समभाव’ हे एकच तत्त्व मान्य आहे. आपण ठणकावून सांगितले पाहिजे की, आमचे मत हे आमच्या भारतमातेसाठी असेल. राजकारणातील संस्कृती जपली पाहिजे; मात्र काही लोक स्वत:च्या अतीमहत्त्वाकांक्षेमुळे या संस्कृतीला विसरले आहेत.