भारताला शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना निवडून द्या ! – माधवी लता

सोलापूर – चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यास पुढील ५ वर्षे समाजाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिंदुस्थानला शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना निवडून द्या. यासाठी १०० टक्के मतदान करा. भारताला विश्वगुरुपदावर न्यायचे असल्यामुळे धोकेबाज लोकांपासून सावध रहा, असे आवाहन भाग्यनगरच्या हिंदु नेत्या माधवी लता यांनी केले. त्या विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजित लोकजागर अभियानाअंतर्गत आयोजित व्याख्यानात बोलत होत्या.

माधवी लता पुढे म्हणाल्या की, भारतातील धर्मनिरपेक्ष लोक पाकिस्तान आणि बांगलादेश येथून होणार्‍या घुसखोरीविरुद्ध कधीच बोलत नाहीत. वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक भूमी विकल्या. सर्व समस्यांवर उपाय म्हणून देशप्रेमी विचारांचे सरकार निवडून देणे आवश्यक आहे. ‘तेलंगाणा येथून आलेल्या पद्मशाली विणकर समाजाने सोलापूरच्या विकासात योगदान दिले आहे’, असे सांगून त्यांनी या समाजाचा गौरव केला.