(म्हणे) ‘ज्यांचे वय झालेले असते, त्यांना मरावेच लागते !’

अशा प्रकारचे विधान करणारे मंत्री जनतेप्रती किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते ! कोरोनासारख्या संकट काळात शासनकर्ते, प्रशासन जनतेचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याने आता जनतेने देवाची आराधना करणेच आवश्यक आहे !

संस्कृतला राष्ट्रभाषा करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रस्ताव होता ! – सरन्यायाधीश शरद बोबडे

डॉ. आंबेडकर यांची इच्छा सरकार आता तरी पूर्ण करणार का ?

हरिद्वारचे अहिंदूंपासून रक्षण करणे आवश्यक ! –  स्वामी अवधेशानंद, जुना आखाडा

साधूसंतांची भूमी हडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी एक कंपू कार्यरत आहे. याविषयी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीकारक यांचा आदर्श समोर ठेवून ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची वेळ आता आली आहे.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) परिसरामध्ये पसरत चाललेल्या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवेदन

उंचगावमध्ये मलेरिया सदृश्य रुग्ण आणि तापाचे रुग्ण यांमध्ये वाढ होत असून याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलीस कर्मचार्‍यामधील झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू !

अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी गुन्हेगार मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या झटापटीत मनिषचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘जानवे धारण करणारे सर्व शूद्रच !’ – के.एस्. भगवान

हिंदूंच्या धर्मशास्त्राचा साधनेच्या स्तरावर अभ्यास न करता बुद्धीने त्याचा किस पाडून अशा प्रकारची विधाने करण्यास बुद्धीप्रामाण्यावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी आघाडीवर आहेत. त्यापैकीच भगवान हे एक आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येईल, असा कोणताही आधार आढळून आलेला नाही ! – डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कृती दल

रेमडेसिवीरमुळे मृत्यूचे प्रमाण न्यून होत नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचाही निष्कर्ष

गरिबांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी