
पुणे – येथील सराईत गुन्हेगार मनिष काळूराम भोसले (वय २० वर्षे) आणि निवृत्त पोलीस कर्मचारी अनंत तुळशीराम ओव्हाळ (वय ६१ वर्षे) यांच्यात झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात १२ एप्रिल या दिवशी ही घटना घडली. या सराईत गुन्हेगाराने मद्याच्या नशेत रस्त्याने जाणार्या एका निवृत्त पोलीस कर्मचार्याची दुचाकी अडवली. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत गुन्हेगाराचा जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला असून निवृत्त कर्मचार्याला अटक केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले आहे. अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. दरम्यान प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये आरंभी मनिषने अनंत ओव्हाळ यांना मारहाण केल्याचे दिसत आहे. यानंतर अनंत यांनीही त्याला मारहाण केली. त्यानंतर खाली पडलेल्या मनिषच्या छातीत अनंत ओव्हाळ यांनी लाथा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
राज्यातील सर्व ५२३ दस्त नोंदणी कार्यालये बंद !