देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘संकल्प हिंदु राष्ट्राचा’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन !

  • विदर्भ, नाशिक, मराठवाडा आणि कान्हादेश (खानदेश) येथील धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

श्री. हर्षद खानविलकर

अमरावती, १५ एप्रिल (वार्ता.) – देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीकारक यांचा आदर्श समोर ठेवून ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची वेळ आता आली आहे. ‘गर्व से कहो हम हिंदु है ।’ हे वाक्य सार्थ करायचे असेल, तर आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी कार्य करायचे आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. १३ एप्रिलला हिंदु नववर्षारंभानिमित्त ‘संकल्प हिंदु राष्ट्राचा’ हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विदर्भ, मराठवाडा, नाशिक, कान्हादेश येथून ८५ धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. सर्व धर्मप्रेमींनी शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शताक्षी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आरंभी लावलेल्या प्रभु श्रीरामाच्या भक्तीगीताने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.

धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती !

१. कु. मृणाल जोशी, नाशिक – हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतल्यावर अंगावर रोमांच आले. ‘तेथील ग्रामदैवत प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद मिळत आहे’, असे जाणवले.

२. सौ. सुषमा बत्रा, नागपूर – ईश्‍वरी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.