हरिद्वार, १५ एप्रिल (वार्ता.) – उत्तरप्रदेशपासून उत्तराखंड वेगळे झाल्यानंतर हरिद्वारमधील ‘हरकी पौडी’ येथील आजूबाजूच्या क्षेत्रात कुणीही मुसलमान भूमी विकत घेऊ शकत नाही आणि भाड्यानेही राहू शकणार नाही, असा कायदा पारित झाला होता; परंतु सद्यःस्थितीत या क्षेत्रात मुसलमानांनी अवैध अतिक्रमण केले आहे. साधूसंतांची भूमी हडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी एक कंपू कार्यरत आहे. याविषयी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. राजेश उमराणी यांनी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’च्या अंतर्गत स्वामीजींची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले कार्य करत आहात. तुमच्या केंद्राला अवश्य भेट देऊ.’’
स्वामीजी पुढे म्हणाले की, पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येच्या प्रकरणाविषयी आज संपूर्ण साधू समाज एकत्र झाला असता, तर षड्यंत्र करणार्यांना योग्य उत्तर मिळाले असते; परंतु अशा विषयात ना साधूंचे साहाय्य मिळते ना सामान्य हिंदूंचे ! साधूंना साधू म्हणून जगणे कठीण झाले आहे.