उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) परिसरामध्ये पसरत चाललेल्या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवेदन

डॉ. रोहिणी बर्गे (डावीकडे) यांना निवेदन देतांना १. राजू यादव आणि अन्य

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), १५ एप्रिल (वार्ता.) – उंचगावमध्ये मलेरिया सदृश्य रुग्ण आणि तापाचे रुग्ण यांमध्ये वाढ होत असून याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी बर्गे आणि डॉ. डी.एस्. कत्रे यांना देण्यात आले. या वेळी उपतालुकाप्रमुख दिपक पाटील, बाळासाहेब नलवडे आदी उपस्थित होते.