(म्हणे) ‘जानवे धारण करणारे सर्व शूद्रच !’ – के.एस्. भगवान

हिंदूंच्या धर्मशास्त्राचा साधनेच्या स्तरावर अभ्यास न करता बुद्धीने त्याचा किस पाडून अशा प्रकारची विधाने करण्यास बुद्धीप्रामाण्यावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी आघाडीवर आहेत. त्यापैकीच भगवान हे एक आहेत. अशांना आता धर्मशास्त्राचे महत्त्व लक्षात येणारे हिंदू भीक घालत नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !

के.एस्. भगवान

बेंगळुरू (कर्नाटक) – यज्ञोपवीत धारण करणारे सर्व शूद्रच आहेत. शूद्र म्हणजे गुलाम. पित्यापासून जन्मलेले नव्हेत (अनौरस), असा अर्थ आहे. मनुस्मृतीत देखील ‘दासी पुत्र’असा उल्लेख आहे,  असे विधान राज्यातील ज्येष्ठ विचारवंत के.एस्. भगवान यांनी केले आहे. (हिंदूच्या धर्मशास्त्रांचा हवा तसा अर्थ काढून लोकांना सांगणारे तथाकथित विचारवंत ! – संपादक) दलित संघर्ष समितीने (समतावाद) ज्योतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘ज्ञान प्रसार ऐक्यता समारंभात’ ते बोलत होते.

के.एस्. भगवान यांनी केलेली विधाने

१. हिंदु धर्मानुसार सर्व शूद्र गुलाम आहेत. म्हणूनच आंबेडकर, पेरियार यांनी मनुस्मृती जाळून टाकली.  तुम्ही तुमच्या मनातच ती जाळून टाकली पाहिजे. (धर्मग्रंथ जाळून टाकल्याने त्यातील विचार नष्ट होत नाही. त्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांनी असंख्य वेळा मनुस्मृती जाळली, तरी त्याचे महत्त्व अद्याप कायम आहे, हे त्यांना लक्षात येत नाही, यातून ते किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)

२. शूद्र शंभूकाने तप केले म्हणून रामाने त्याचा शिरच्छेद केला, असा वाल्मीकि रामायणात उल्लेख आहे. अशा रामाची देव म्हणून पूजा करायची का ? राम, कृष्ण सर्व चातुर्वणाचे प्रतिपादक आहेत. अशा सर्व देवांचा तिरस्कार केला पाहिजे. (हिंदू सहिष्णु असल्याने तथाकथित पुरो(अधो)गामी अशा प्रकारची विधाने करू धजावतात; मात्र ते अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी अशा प्रकारची टीका करण्याचे धाडस करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) ४ टक्के लोकसंख्या असलेले ब्राह्मण या देशाचा राज्यकारभार चालवतात, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. (खोटे बोला, पण रेटून बोला, असा प्रकार सध्या ब्राह्मणद्वेष्ट्यांकडून चालू आहे. सध्या आरक्षण विकृतीमुळे देश कोण चालवत आहे, हे जगाला ठाऊक आहे ! – संपादक)

३. उच्च-नीचतेच्या विरोधात असलेले गांधीजी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्याविषयी अभिमान वाटतो; परंतु त्यांनी स्वीकारलेले सिद्धांत अपायकारक होते. (हे गांधीवाद्यांना आणि काँग्रेसवाल्यांना मान्य आहे का ? – संपादक)

४. विवेकानंदांनी हिंदु धर्माला उचलून धरल्याचे अनेक लोक सांगतात. त्यांच्यासारखे अत्यंत कडवटपणे हिंदु धर्मावर टीका करणारे दुसरे कोणी नाही. (जर स्वामी विवेकानंद यांनी टीका केली असेल, तर ती त्यातील लोकांमुळे निर्माण झालेल्या अयोग्य गोष्टींवर असेल आणि त्यात योग्य पालट करण्यासाठी असेल; मात्र तथाकथित पुरो(अधो)गामी जी काही टीका करत आहेत, त्यामागे केवळ द्वेष आणि द्वेषच आहे ! – संपादक)

५. कोरोनाच्या संदर्भात मंदिर, मशीद, चर्च सर्व बंद करण्यात आले. जर देव होता तर अशा बिकट परिस्थितीत त्याने आपले रक्षण का केले नाही ? (देव केवळ भक्तांचे रक्षण करतो, त्यामुळे ‘देवाने आपले रक्षण करावे’, असे वाटत असेल, तर भक्त बनने आवश्यक आहे. त्यासाठी देवावर नितांत श्रद्धा असली पाहिजे. बुद्धीप्रामाण्यावाद्यांकडे त्याचीच उणीव आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे ! – संपादक) राज्य करणारे आपल्यात अंधश्रद्धा रुजवत आहेत. देवस्थाने बांधून आम्हाला मूर्ख बनवत आहेत. वाचनाच्या आवडीनेच अशी षड्यंत्रे समजणे, त्याचा प्रतिकार करणे साध्य होईल.