जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर अध्यात्म आणि संस्कार यांची दिशा देणारे ठरेल ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

पुणे – श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर उभारण्यात येणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर हे पुढील अनेक पिढ्यांसाठी अध्यात्म, संस्कृती आणि संस्कार यांची दिशा देणारे ठरेल. या पवित्र भूमीचा नावलौकिक जगभरामध्ये होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. त्यांनी मंदिर बांधकामाच्या वेळी सदिच्छा भेट दिली त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराप्रती सर्वांची समर्पणाची भावना आहे. प्रत्येक वारकर्‍यांसाठी हे मंदिर अभिमानास्पद आहे. बावनकुळे यांनी नियोजित मंदिराच्या बांधकामाची पहाणी केली, तसेच या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.