राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केली जाणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीवर गृहमंत्री देवेंद्र फडणविसांचे उत्तर !

मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – राज्यात कोणत्याही परिस्थितीत कंत्राटी पद्धतीने पोलीसभरती केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जुलै या दिवशी विधानसभेत दिले. काही वृत्तपत्रांमध्ये राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीसभरती केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. याविषयी गृहमंत्र्यांनी विधीमंडळात स्पष्टीकरण दिले.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी ‘सभागृहात मंत्री उपस्थित नसतात’, असे सांगतांना मंत्री कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याची टीका केली. यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘कोणतेही मंत्री कंत्राटी पद्धतीने नाहीत. तुम्हाला कंत्राटी पद्धतीने यायचे असल्यास येऊ शकता’’, असे मिश्किल उत्तर दिले.