महाराष्ट्रातील ५ शहरांत हिंसक कारवाया घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट ! – पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, नागपूर

नक्षलवाद संपवण्यासाठी प्रथम शहरांमध्ये फोफावणारा शहरी नक्षलवाद संपवणे आवश्यक आहे. जिहादी आतंकवादाएवढीच ही समस्या गंभीर असून ती सोडवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

Mufti Azhari Arrested : हिंदूंना ‘कुत्रा’ म्हणणारा मुफ्ती अजहरी याला अटक

आतापर्यंत अझहरी यांच्यावर अनेकदा द्वेषयुक्त भाषण केल्याचे आणि असहिष्णूतेला प्रोत्साहन दिल्याचे आरोप झालेले आहेत. वर्ष २०१८ मध्ये कर्नाटक येथेही हिंदूंविरोधी टिपणी केल्याचा गुन्हा त्यांच्यावर अद्याप नोंद आहे. सध्या ते जामिनावर आहेत.

आगामी निवडणुकीत गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

‘जनसंवाद यात्रे’च्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री ठाकरे ४ फेब्रवारी या दिवशी जिल्हा दौर्‍यावर आले होते. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराजेश्वर’ मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मुंबईत साडेतीन लाखांहून अधिक कुटुंबांनी सर्वेक्षणास दिला नकार !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण पडताळण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे.

पहिल्या रांगेतून न्यायमूर्तींना उठवल्याने सर्वच न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून गेले !

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात २ फेब्रुवारीच्या रात्री उद्घाटन कार्यक्रमात खंडपिठातील न्यायमूर्तींना सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. या न्यायमूर्तींना जागेवरून उठवण्यात आल्याने उपस्थित न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून निघून गेले.

भूखंड विक्रीची विज्ञापने देणार्‍या ४१ जणांना ‘महारेरा’कडून नोटीस !

राज्यात भूखंड, घरे, इमारती यांच्या विक्रीसाठी ‘महारेरा’ची (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची) नोंदणी आवश्यक आहे. तसे न करता अनेक ठिकाणी भूखंडाचे तुकडे पाडून त्याविषयीची विक्री करण्याचे विज्ञापन दिले जाते.

गणी आजरेकर यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा नोंद !

लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकार्‍यांना रोखल्याच्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी ‘मुस्लीम बोर्डिंग’चे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्यासह ६०० हून अधिक संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वलांडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या अल्ताफला फाशीची शिक्षा द्या !

लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील अल्पवयीन हिंदु मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ कुरेशी याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी येथील अखिल भारतीय हिंदु खाटिक समाजाच्या वतीने १ फेब्रुवारी या दिवशी फेरी काढून निषेध नोंदवण्यात आला.

मुंबई महापालिका महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ॲप’ सिद्ध करणार !

महापालिकेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ॲप’ सिद्ध केले जाणार आहे. संकटात असणार्‍या महिलांना ‘ॲप’मुळे तात्काळ साहाय्य मिळेल, अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे. ॲपच्या साहाय्याने महिला पोलीस, पालिका किंवा सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधू शकेल.

अनुपस्थित आरोग्य कर्मचार्‍यांमुळे महिलेची आरोग्य केंद्रासमोरच प्रसूती !

तालुक्यातील बर्दापूर आरोग्य केंद्रात एक महिला प्रसुतीसाठी आली असता एकही आरोग्य कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने या महिलेची आरोग्य केंद्रासमोरच प्रसुती झाली. या घटनेनंतर आरोग्य केंद्रासमोर मोठा जमाव जमला.