सातारा, १ एप्रिल (वार्ता.) – विजेची थकबाकी शून्य करा, तसेच ग्राहकांना अखंडित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्ययावत् ठेवा, वेळोवेळी रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती करा, अशा सूचना ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी सातारा क्षेत्रीय भेटीमध्ये केल्या.
भादीकर पुढे म्हणाले की, भविष्यात महावितरण मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध करणार आहे. त्यासाठी उपकेंद्रामधील यंत्रणा सक्षम करावी. उपकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावी, जेणेकरून ग्राहकांना अखंड वीज उपलब्ध करणे शक्य होईल. शाखा कार्यालयाने ध्येय थकबाकी कोणत्याही परिस्थितीत शून्य करण्याचे आवाहन केले. वसुलीमध्ये चालढकलपणा करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल.