बाजारात हरवलेले पैशाचे पाकीट संबंधित महिलेला दिले

उर्मिला ठोंबरे यांना पाकीट परत केले.

गुहागर – तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील प्रसिद्ध शिवणकाम करणारे आणि व्यापारी संघटना आबलोलीचे सल्लागार श्री. शशिकांत पवार यांना त्यांच्या दुकानासमोर एक पैशाचे पाकीट मिळाले. पाकीट हरवलेली संबंधित उर्मिला ठोंबरे यांना ते पाकीट त्यांनी परत केले.

श्री. पवार यांनी सर्वप्रथम हे पाकीट मिळाल्याची बातमी आबलोली व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कानावर घातली. यानंतर संबंधित महिलेचा शोध घेण्यात आला. यानंतर पाकिटाची आणि त्या महिलेची निश्चिती करून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. ऋषीकेश बाईत, उपाध्यक्ष विजय पागडे, माजी उपाध्यक्ष प्रमोद गोणबर आणि अन्य सदस्या यांच्या समक्ष कुडली माटलवाडी येथील उर्मिला लक्ष्मण ठोंबरे या महिलेला तिचे पाकीट देण्यात आले. या पाकीटामध्ये १००० रुपये आणि काही नाणी होती.  शशिकांत पवार यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्यावर व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

संपादकीय भूमिका

श्री. शशिकांत पवार यांच्यासारखे प्रामाणिकपणा असणारे नागरिक सर्वत्र हवेत, जेणेकरून राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होईल !