मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रकार
मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका आफ्रिकन अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने या तस्कराच्या पोटातून कोकेनच्या ७४ कॅप्सूल्स जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत ११ कोटी रुपये आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. त्याच्या पोटाचा क्ष-किरण अहवाल काढल्यावर पोटात काहीतरी असल्याचे आढळून आले.
२४ मार्च या दिवशी आफ्रिकन देशातील एका महिलेला १९.७९ कोटी रुपयांच्या १ सहस्र ९७९ ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली होती. तिने बूट, मॉइश्चरायझर आणि शॅम्पूच्या बाटल्या यांमध्येे कोकेन लपवून आणले होते.