सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून होण्यासाठी नागरिकांनी आग्रही रहावे ! – अभिरूप न्यायालयात पार पडलेल्या संवादाचा सूर

मराठी भाषेचा न्यूनगंड काढून मराठी बोलली किंवा वाचली गेली पाहिजे. सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा, यासाठी मराठी भाषिक नागरिकांनी आग्रही रहावे, असे मत साहित्य संमेलनात पार पडलेल्या अभिरूप न्यायालयात व्यक्त करण्यात आले.

‘आदर्श फाऊंडेशन’च्या वतीने प्रदीप माने ‘पर्सन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित !

श्री. प्रदीप माने यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या काळात ‘पाणी फाऊंडेशन’साठी मोठे कार्य केले. त्यांना ‘आदर्श सरपंच’ म्हणून गौरवण्यात आले असून सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे मोठे संघटन आहे.

एखाद्या घटनेमुळे महायुतीत फरक पडत नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या संदर्भातील घटनेची सखोल चौकशी गृहखाते करत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना सहस्रो वेळा घडल्या आहेत; पण त्या घटनांचे उदाहरण देऊन आजची घटना झाकता येणार नाही.

गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप केले आहेत, ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यांनी शिंदेंवर व्यक्तीशः आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही आमचे मत फडणवीस यांच्यासमोर मांडले आहे

पुणे येथे अंत्यविधीसाठी गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या ‘गोकाष्ठा’चा वापर !

गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोकाष्ठाचा उपयोग अंत्यविधीसाठी केल्यास वृक्षतोड थांबून, प्रदूषणही अल्प होईल. शहरातील स्मशानभूमीमध्ये गोकाष्ठाचा वापर करण्यास अनुमती द्यावी, असा प्रस्ताव ‘जय जिनेंद्र’ या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला दिला होता.

सोलापूर येथे ‘युवा चेतना शिबिरा’त स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी मार्गदर्शन !

सध्याचा युवावर्गच समाजास पर्यायाने राष्ट्रास जोमाने प्रगतीपथावर नेऊ शकतो, या विश्वासाने १६ ते ३० वर्षे वयोगटातील युवक आणि युवती यांसाठी २६ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘युवा चेतना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील आर्.टी.ओ. कार्यालयांतील वाहन परवाना यंत्रणा ठप्प !

गेल्या २ दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध ‘आर्.टी.ओ.’ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) कार्यालयांतील वाहन परवाना देण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास आंदोलन ! – साथीदार युथ फाऊंडेशन

१६ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन ‘साथीदार युथ फाऊंडेशन’च्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.

धर्माधिष्ठित घटनात्मक हिंदु राष्ट्र स्थापन करा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

आजही सनातन धर्म टिकून आहे, तो चिरंतन आणि शाश्वत आहे. हिंदु देवता, धर्मग्रंथ, तसेच श्रद्धास्थाने यांचे विडंबन करणार्‍या धर्मद्वेष्ट्यांचा सनदशीर मार्गाने विरोध करा !

हिंदू संघटित झाल्यास रामराज्य येईलच ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

जगातील प्राचीन संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती, प्राचीन धर्म म्हणजे हिंदु धर्म आहे. हा हिंदु धर्म टिकवायचा असेल, तर प्रत्येकाने संघटित होणे आवश्यक आहे.