भोगावती नदीला दूषित पाणी, मृत माशांचा खच

भोगावती नदीला दूषित पाणी आल्याने नदीपात्रात मासे मृत्यूमुखी पडू लागले आहेत.

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील सिद्धेवाडीच्या महाकाय मारुतीच्या मूर्तीचे स्थलांतर

अत्यंत जड अंतःकरणाने ही मूर्ती मला स्थलांतरित करावी लागते आहे.

(म्हणे) ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ?’ – अभिनेता झिशान अय्युब यांचा प्रश्‍न

धर्मांध तरुण हिंदु तरुणीचा धर्म पाहूनच प्रेम करण्याचे नाटक करतात, हे अय्युब यांना ठाऊक असूनही ते वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम राष्ट्रीय शक्ती करतील ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रविघातक शक्तींसमवेतच्या युतीत काँग्रेस सहभागी होत आहे. ‘आम्ही विघटनवाद्यांना समवेत घेऊन चर्चा करू’, ‘काश्मीर पाकमध्ये गेले पाहिजे’ अशी मागणी करणार्‍यांसमवेत काँग्रेस उभी आहे….

प.पू. काणे महाराजांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त मनोहरबाग येथे कार्यक्रम पार पडला

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. आणि सौ. अवचट यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला. यानंतर भक्तांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ’ या मंत्राचा वैखरीतून नामजप करून प.पू. काणे महाराजांच्या संदर्भातील आठवणी तसेच प्रसंग सांगितले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव पुसून टाका ! – प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज

आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट टाकण्याएवढेच सिमीत न रहाता प्रत्येक मंडळ, घरांमध्येही सैनिक हुतात्मा झालेल्याचा दुखवटा व्यक्त केला पाहिजे, असे मत दत्त मंदिर तमणाक वाडा येथील प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज यांनी व्यक्त केले.

३० लाखांच्या मुद्देमालासह ५० हून अधिक घरफोड्या करणारे सराईत चोरटे जेरबंद !

शहर आणि परिसरात ५० हून अधिक घरफोड्या करणार्‍या सनिसिंग दूधानी आणि सोहेल जावेद शेख यांच्यासह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनाने भाविकांना झाले भावाश्रू अनावर !

महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे श्री स्वामी समर्थांचे मंदिरही १६ नोव्हेंबरपासून उघडण्यात आले.

(म्हणे) ‘पं. नेहरू यांनी दूरदृष्टीने राष्ट्राचा पाया रचला !’

काँग्रेसने ६० वर्षांच्या सत्ताकाळात लाखो कोटी रुपयांचे घोटाळे करून देशावरील कर्जाचा डोंगरच वाढवला.  ही राष्ट्रउभारणी आहे का ? प्रत्येक क्षेत्रात देशाला अधोगतीकडे नेणारी काँग्रेस देशाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळाच आहे, असेच जनतेला वाटते ! – संपादक

मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर छठ पूजेला यंदा बंदी – मुंबई महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनार्‍यावर छठ पूजेला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी या वर्षी घरीच छठ पूजा साजरी करण्याचे आवाहन केले आहे.