३० लाखांच्या मुद्देमालासह ५० हून अधिक घरफोड्या करणारे सराईत चोरटे जेरबंद !

असुरक्षित पुणे !

५० हून अधिक घरफोड्या केल्यानंतर चोरटे सापडतात हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?

पुणे – शहर आणि परिसरात ५० हून अधिक घरफोड्या करणार्‍या सनिसिंग दूधानी आणि सोहेल जावेद शेख यांच्यासह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. यातील १२ घरफोड्या उघड झाल्या असून पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा आणि ५ चारचाकी गाड्या यांसह जवळपास २९ लाख ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.