हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बहिरेवाडी येथील सैनिक ऋषिकेश जोंधळे (वय २० वर्षे) हे ४ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथे हुतात्मा झाले. यानंतर १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६.४० वाजता ऋषिकेश यांचे पार्थिव गावात आणण्यात आले.

मुंबईत फटाकेबंदी कागदावरच

दीपावलीच्या दिवसात मुंबईमध्ये पहाटेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी फटाकेबंदी केवळ कागदावरच राहिली. गेल्या ४ वर्षांचा आढावा घेता तुलनेने ध्वनीप्रदूषण अल्प असले, तरी आवाजी फटाके फोडू नयेत, या आवाहनाला नागरिकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही

‘हिंदु धर्मात दोन लग्न करतात का ?’ – महिला तलाठी सय्यद, तारळे (जिल्हा सातारा)

प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्‍या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

सोलापूर येथे वसुबारसच्या दिवशी ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा पार पडला

आपण जन्माला येतांना सुख, दुःख, गुण आणि दोष हेही समवेत घेऊन येतो; मात्र सद्गुरूंची सेवा करतांना आपण घेऊन आलेले दोष न्यून होतात आणि सद्गुण वाढतात. परमार्थाच्या सेवेमध्ये व्यक्तीचे परिवर्तन होणे ही सद्गुरूंची कृपाच असते.

दुर्गनाद प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी केलेल्या कवलापूर (जिल्हा सांगली) येथील सिंहगडाच्या प्रतिकृतीचे अनावरण !

दुर्गनाद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी ३ मासांच्या अथक प्रयत्नांनंतर कवलापूर येथे सिंहगडाची प्रतिकृती साकार केली आहे.

सिंधुदुर्गात गत २४ घंट्यांत कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३३ झाली आहे.

वेळागर (वेंगुर्ले) येथील समुद्रात बुडून कारवार येथील तरुणाचा मृत्यू

अंघोळीसाठी पाण्यात जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू.

मालवण येथील ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !

ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्‍वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांत गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर !

कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.

सनातनचे ग्रंथ अध्यात्मातील दीपस्तंभ ! – आमदार महेश शिंदे, शिवसेना, कोरेगाव

दीपावलीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी सनातनच्या ३०० ग्रंथांची मागणी केली आणि वरील उद्गार काढले.