पुणे, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – प.पू. काणे महाराजांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त १७ नोव्हेंबर या दिवशी श्री. शशिकांत ठुसे यांच्या मनोहरबाग (नारायणगाव) येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. आणि सौ. अवचट यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला. यानंतर भक्तांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ’ या मंत्राचा वैखरीतून नामजप करून प.पू. काणे महाराजांच्या संदर्भातील आठवणी तसेच प्रसंग सांगितले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी श्री. रामचंद्र कृष्ण चंदगडकर लिखित ‘नामजपाचे महत्त्व’ हे पुस्तक सर्वांना भेट दिले.
वैशिष्ट्यपूर्ण
कार्यक्रमाच्या ठिकाणी चैतन्य जाणवून प.पू. काणे महाराजांच्या समाधीजवळ शांतीची अनुभूती येत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. तसेच २ घंटे नामजप केल्यावर उपाय झाल्याचेही अनेक भक्तांनी सांगितले.