बेळगाव पोटनिवडणुकीत केवळ ५६ टक्के मतदान !

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल या दिवशी केवळ ५५.६१ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदा १२ टक्के घट झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

बेंगळुरूमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडून अवैधरित्या घेतले जात आहेत ३५ ते ४० सहस्र रुपये !

भारतियांच्या नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे दाखवणारी ही लज्जास्पद घटना ! अशांना अटक करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा दिली पाहिजे !

कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !

कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.

(म्हणे) ‘जानवे धारण करणारे सर्व शूद्रच !’ – के.एस्. भगवान

हिंदूंच्या धर्मशास्त्राचा साधनेच्या स्तरावर अभ्यास न करता बुद्धीने त्याचा किस पाडून अशा प्रकारची विधाने करण्यास बुद्धीप्रामाण्यावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी आघाडीवर आहेत. त्यापैकीच भगवान हे एक आहेत.

अल्पवयीन मुलीला गुप्तांग दाखवणार्‍या वासनांध धर्मांधाला अटक

अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

अनाथालयातील मुलांवर लैैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चोरट्यांनी देवळातील चोरलेल्या घंटा परत केल्या !

सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीकडून देवतांच्या बेवारस पडलेल्या चित्रांचे विसर्जन करण्याचे अभियान !

शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.

भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र विधीला ‘पेटंट’ !

भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. प्रत्येकाने येणार्‍या आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त असा अग्निहोत्र विधी शिकणे आवश्यक !