
बेळगाव – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल या दिवशी केवळ ५५.६१ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदा १२ टक्के घट झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यात प्रमुख लढत होत आहे. ८ विधानसभा मतदारसंघांपैकी गोकाक मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६० टक्के, तर बेळगाव उत्तर मतदारसंघात केवळ ४२ टक्के मतदान झाले. २ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांनाही मतदानाची मुभा दिल्याने त्यांनी ‘पीपीई किट’ घालून सायंकाळी मतदान केले.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !