प्रत्येकाने येणार्या आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त असा अग्निहोत्र विधी शिकणे आवश्यक !

बेळगाव – भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. हे ‘पेटंट’ मिळवण्यासाठी बेळगावचे सुपुत्र डॉ. प्रमोद मोघे, तसेच त्यांचे सहकारी प्रणय अभंग आणि गिरीश पठाणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. अग्निहोत्र या विधीचा शास्त्रीय, तसेच प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करून या तिघांनीही त्यातून निघणार्या धुराचे वातावरणात होणारे परिणाम, तसेच राखेची उपयुक्तता, जलशुद्धीकरणासाठी राखेचा वापर यांसंदर्भात महत्त्वाचे संशोधन करून प्रयोगशाळेत सिद्ध केले.
या सर्व प्रायोगिक संशोधनासाठी पुणे येथील प्रज्ञा विकास मंचच्या फ्रास्ट संस्थेने पुढाकार घेऊन अर्थसाहाय्य केले. प्रयोगाअंती अग्निहोत्र राख ही जंतूनाशक असून जलशुद्धीकरणासाठी तिचा उपयोग होतो हे जगासमोर सिद्ध करून जागतिक ‘पेटंट’ मिळवले. (अग्निहोत्र या विषयासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्याची उपयुक्तता लक्षात घेता देशपातळीवर अग्निहोत्र होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे सामान्यांना वाटते ! – संपादक)
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !