‘हिजाब न घालणार्‍या मुलींवर बलात्कार होतात’, असे विधान करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून क्षमायाचना

अहमद यांनी ट्वीट करून म्हटले की, देशातील महिलांवर वाढते अत्याचार पहाता मी चिंतीत आहे. बुरखा आणि हिजाब यांद्वारे या घटना रोखता येऊ शकतात.

(म्हणे) ‘गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्याची अनुमती द्या !’  

आम्ही केवळ कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान दिलेले नाही, तर गणवेशाच्या रंगाचाच हिजाब वापरण्याची अनुमती आम्हाला मिळावी, असा सकारात्मक आदेश देण्याची विनंती करत आहोत, अशी मागणी कर्नाटक उच्च न्यायालयात मुसलमान विद्यार्थिनींनी केली आहे.

कुराणमध्ये सांगितलेली सर्व बंधने अनिवार्य प्रथेच्या अंतर्गत येतात का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्न

राज्यघटनेतील कलमानुसार राज्य सरकार कोणतीही धार्मिक, आर्थिक आणि राजकीय कृती थांबवू शकते. जर आरोग्य आणि नैतिकता यांच्याशी संबंधित असेल, तर धर्माशी संबंधित मूळ प्रथेवरही नियंत्रण आणण्यात येऊ शकते.

हिजाबच्या नावाखाली कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आणि हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा !

राज्यातील चेन्नगिरी, हरिहर, कुशालनगर, मलेबेन्नुरू इत्यादी ठिकाणी सामाजिक माध्यमांवरून हिजाबविषयी माहिती प्रसारित करणार्‍यांवर  प्राणघातक आक्रमणे करण्यात येत आहेत.

कर्नाटकमधील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींकडून हिजाब घालून शाळेत प्रवेश करण्याचा प्रयत्न

शाळांकडून प्रवेश देण्यास नकार
कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणारे धर्मांध !

हिजाब न घातल्यामुळेच जगातील सर्वाधिक बलात्कार भारतात होतात !’ – काँग्रेसचे नेते जमीर अहमद

हिंदु नेत्यांनी ‘मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात’, असे विधान केल्यावर त्यांना प्रतिगामी ठरवत त्यांच्यावर तुटून पडणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, हिंदुद्वेषी प्रसारमध्यमे आदी अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?

‘म्हैसुरू-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेस’चे नाव पालटून ‘वोडेयार एक्स्प्रेस’ करा ! – म्हैसूरतील भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची मागणी

आक्रमकांच्या स्मृती पुसण्याऐवजी त्या वर्षानुवर्षे जपणारा जगातील एकमेव देश भारत !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव आणि खानापूर येथे निवेदन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार परघी यांना निवेदन देण्यात आले.

श्रीलंकेतील नौदलाकडून भारताच्या १२ मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने सांगितलेले हे कारण योग्य आहे कि ‘श्रीलंका भारतावर कुरघोडी करण्यासाठी भारतीय मासेमारांना अटक करत आहे’, हे भारतीय जनतेला समजायला हवे !

उडुपी येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या

हिजाबच्या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या दूरभाषद्वारे येत आहेत.