श्रीलंकेतील नौदलाकडून भारताच्या १२ मासेमारांना अटक

रामेश्‍वरम् – तमिळनाडूतील धनुष्यकोडी-थलाईमन्नार परिसरातील समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या भारताच्या १२ मासेमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. त्यांना श्रीलंकेच्या स्थानिक न्यायालयात उपस्थित करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. या १२ मासेमारांकडून २ नौका कह्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर श्रीलंकेच्या समुद्री भागात अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

(श्रीलंकेच्या नौदलाने सांगितलेले हे कारण योग्य आहे कि ‘श्रीलंका भारतावर कुरघोडी करण्यासाठी भारतीय मासेमारांना अटक करत आहे’, हे भारतीय जनतेला समजायला हवे ! – संपादक)