कर्नाटकमधील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींकडून हिजाब घालून शाळेत प्रवेश करण्याचा प्रयत्न

शाळांकडून प्रवेश देण्यास नकार

कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणारे धर्मांध ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

मंड्या (कर्नाटक) – येथे १४ फेब्रुवारीपासून पुन्हा शाळा आणि महाविद्यालये चालू झाले. हिजाबच्या प्रकरणामुळे राज्यात तणाव निर्माण झाल्याने कर्नाटक सरकारने ३ दिवस शिक्षणसंस्थांना सुटी दिली होती. या काळात कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘अंतिम निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालये यांत कोणताही धार्मिक पोषाख न करता जावे’, असा अंतरिम आदेश दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंड्या येथे एका शाळेमध्ये काही मुसलमान पालक त्यांच्या मुलींना हिजाब घालून शाळेत सोडण्यासाठी आले होते. त्या वेळी शाळेच्या प्रशासनाने त्यांना हिजाब काढण्यास सांगितले.

या वेळी येथील रोटरी शाळेच्या बाहेर मुसलमान पालकांनी महिला शिक्षकाशी वाद घातला; मात्र शिक्षकांनी विद्यार्थिनींना हिजाब घालून शाळेत प्रवेश करण्यापासून रोखले.

मुसलमानांवर अन्याय होत असल्याचे ‘एन्.डी.टी.व्ही.’कडून एकांगी वृत्तांकन !

‘जेएन्यू’तील भारतद्वेष्ट्या विद्यार्थ्यांचे समर्थन करणार्‍या, काश्मीरमधील धर्मांधांच्या विरोधात सैनिकी कारवाई झाल्यावरून आकाशपाताळ एक करणार्‍या आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचा उदोउदो करणार्‍या भारतद्वेष्ट्या ‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनीवर आता राष्ट्रप्रेमींनी बहिष्कार घातला पाहिजे ! अशा उपटसुंभांची आर्थिक नाकेबंदी केल्यावरच ते सुतासारखे सरळ होऊ शकतात, हे जाणा ! – संपादक

‘एन्.डी.टी.व्ही.’ च्या संकेतस्थळाच्या ‘होमपेज’वर सर्वांचे लक्ष वेधले जाईल, अशा ठिकाणी ‘बिग स्टोरी’ असा मथळा देऊन मंड्या येथील रोटरी शाळेबाहेर एका शिक्षिकेने हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना कशा प्रकारे रोखले आणि त्यांच्या पालकांशी कसा वाद घातला गेला, याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या वृत्तामध्ये दिवसभरात कर्नाटकातील विविध शाळांमध्ये हिजाब घालून गेलेल्या विद्यार्थिनींना रोखण्यात आले अथवा माघारी पाठवण्यात आले, अशा प्रकारे वृत्तांकन करण्यात आले आहे. यातून शाळा या विद्यार्थीविरोधी किंबहुना मुसलमानद्वेष्ट्या असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. एकूणच भारत हा इस्लामविरोधी देश बनत चालला असल्याचे या वृत्तातून भासवण्यात आल्याचा ‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनीने केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.