बेंगळुरू (कर्नाटक) – ‘हिजाब न घालणार्या मुलींवर बलात्कार होतात’, असे विधान करणारे काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी या विषयी क्षमायाचना केली आहे.
अहमद यांनी ट्वीट करून म्हटले की, देशातील महिलांवर वाढते अत्याचार पहाता मी चिंतीत आहे. बुरखा आणि हिजाब यांद्वारे या घटना रोखता येऊ शकतात. कुणाचा अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. मला वाटते की, आमच्या पूर्वजांनी महिलांच्या रक्षणासाठी बुरखा आणि हिजाब अनिवार्य केले होते.
I beleive our ancestors had mandated wearing burqa-hijab as religious practice in order to protect women. My statement was based on this belief & there was no other reason.
— B Z Zameer Ahmed Khan (@BZZameerAhmedK) February 14, 2022