|
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘इस्लाममध्ये हिजाब म्हणजे पडदा. वयात आल्यानंतर मुलींनी हिजाब घालून स्वतःचे सौंदर्य झाकून ठेवलेच पाहिजे. जगात सर्वाधिक बलात्कार भारतात होतात. याचे कारण काय ? तर त्या महिला स्वतःचा तोंडवळा झाकून ठेवत नाहीत’, असे विधान कर्नाटकातील काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी केले. ‘हिजाब परिधान करण्याचा उल्लेख कुराणमध्ये नाही’, असे वक्तव्य केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी नुकतेच केले होते. त्यासंदर्भात जमीर बोलत होते. (जमीर यांना जर खान यांचा प्रतिवाद करायचा असेल, तर तो कुराणच्या आधारेच करून दाखवला पाहिजे; मात्र खान यांनी जमीर आणि अन्य धर्मांध यांचा दावा पुराव्यासह उडवून लावल्याने त्यांना काहीच सुचेनासे झाले आहेत अन् म्हणून ते अशी विधाने करत आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)
‘Women get raped when they don’t wear hijab’: Karnataka Congress leader’s outrageous remark.#HijabControversy #KarnatakaHijabControversy #KarnatakaHijabRow https://t.co/r89tFooZFs pic.twitter.com/INwf8TPSCE
— News18.com (@news18dotcom) February 13, 2022