संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जन्मोत्सव !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण !

पुणे – ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्यांची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील घोषित केला जाणार आहे.

३ ते १० मे या कालावधीत जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती ‘संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान’चे प्रमुख योगी निरंजननाथ यांनी दिली.