सूर्याला नमस्‍कार घालण्‍यामुळे होणारे लाभ !

‘स्नान करून सूर्याला नमस्‍कार घालणार्‍याला व्‍यायामाचे फळ तर मिळेलच. हे नमस्‍कार तो आरोग्‍यासाठी घालत नाही, तर उपासनेसाठी घालत असतो. त्‍यामुळे शरिराला आरोग्‍य लाभतेच, तसेच त्‍याच्‍या बुद्धीची प्रभाही फाकते. आरोग्‍यासह सूर्यापासून त्‍याला स्‍फूर्ती आणि प्रतिभा हेही मिळते.’

व्‍यायामासाठी वेळ द्या !

निरोगी आरोग्‍याची किल्ली म्‍हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग म्‍हणजे योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम. त्‍यामुळे प्रत्‍येकाने निरोगी आयुष्‍यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठेवण्‍याचा प्रयत्न करून नियमित काही वेळ योगाभ्‍यासाला किंवा व्‍यायामाला देणे अत्‍यावश्‍यक आहे.

उत्‍साही आणि निरोगी आयुष्‍याचा मूलमंत्र : योगासने !

योगसाधनेमुळे सकारात्‍मकता येऊन मनुष्‍याचा जीवनाकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोनही सुधारतो. ही व्‍यायामपद्धती संपूर्ण भारतीय आहे. आपल्‍या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपासून ही पद्धत शोधून काढली आणि स्‍वीकारली होती. त्‍यामुळे ते दीर्घकाळ स्‍वस्‍थ आणि निरोगी जीवन जगू शकत होते. 

गोवा आणि उत्तराखंड राज्यांत पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार !

मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.

उन्हाळ्यामध्ये हलका व्यायाम करावा !

 ‘उन्हाळ्यामध्ये शरिराची शक्ती न्यून झालेली असते. या दिवसांमध्ये व्यायाम करायचा झाल्यास तो योगासने आणि प्राणायाम अशा स्वरूपाचा असावा. सवय नसतांना वजन उचलण्याचे व्यायाम किंवा ज्या व्यायामांनी लवकर दमायला होते, असे व्यायाम करणे टाळावे.’

१० वर्षांनी भारत जागतिक महसत्ता असेल ! – योगऋषी रामदेवबाबा

योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.

जगाच्या पाठीवर कुठूनही भक्तगण गोव्यातील कुलदेवतेची ‘व्हर्च्युअल’ पूजा करू शकणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

मंगेशी, कवळे, रामनाथी, तांबडी सुर्ला येथील मंदिरांना प्रतिवर्ष अनेक पर्यटक भेट देतात. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच याच परिसरातील पर्यावरणपूरक स्थानांना भेट देण्यासाठी योजना आहे.

राष्ट्रवाद आणि अध्यात्मवाद भक्कम करणार्‍या पाठ्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल ! – योगऋषी रामदेवबाबा

भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते.

दिवसातून एक घंटा योगासाठी द्या ! – योगऋषी रामदेवबाबा

गोव्यातील सर्व समुद्रकिनारे योगमय व्हावेत, तसेच सर्वांना योग आणि आयुर्वेद यांच्या माध्यमांतून सुदृढ आरोग्य लाभावे, यासाठी योगऋषी रामदेवबाबा, ‘पतंजलि योग समिती’ आणि कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ यांचा प्रयत्न आहे.

शिबिरासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती लावण्याचा आदेश मागे घ्यावा ! – काँग्रेस

काँग्रेसला पोटशूळ ! भाजप सरकार गोव्यातील पारंपरिक कार्निव्हल महोत्सवाला आळा घालत आहे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या शिबिराला शिक्षक, ‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’ आणि ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक यांना बंधनकारक करत आहे.