हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोथरूडमधील २ शाळांमध्ये योग शिबिराचे आयोजन !

सौ. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करतांना विद्यार्थी

पुणे, २४ जून (वार्ता.) – ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधून कोथरूड येथील लोढा शाळेमध्ये, तसेच पौड रस्ता येथील वनाज परिवार शाळेत योग शिबिराचे आयोजन केले होते. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. वैशाली अभ्यंकर यांनी योग उपक्रम घेतला. सौ. अभ्यंकर या योग शिक्षिका असून त्यांनी मुलांना सहज सोप्या आसनांमधून योग आणि प्राणायाम यांचे महत्त्व लक्षात आणून दिले. लोढा शाळेत २५ जणांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला, तर वनाज येथील शाळेत १४० हून अधिक विद्यार्थ्यांनी योग शिबिराचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी वनाज परिवार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वृषाली वाशिमकर यांचे सहकार्य लाभले. लोढा शाळेतील मुख्याध्यापकांनी ‘शाळेमध्ये सर्व उपक्रम घेऊ शकता’, असे आश्वासन दिले.