भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

पंतप्रधान मोदी यांनी श्रीनगरमध्ये साजरा केला योगदिन

नवी देहली – भारतासह जगभरात १०वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगदिन साजरा केला. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, ‘आज जगात योग करणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे. योग हे केवळ ज्ञानच नाही, तर शास्त्रही आहे.’ जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन या देशात लोकांनी योग केला. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर अनुमाने १० सहस्र लोकांनी योग केला.