भावी पतीचा गुन्हा समजल्यावर महिला उपनिरीक्षकाकडून त्याला अटक

जुनमोनी राभा यांना त्यांच्या होणार्‍या पतीने केलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला अटक करून कारागृहात टाकले. त्यामुळे राभा यांचे कौतुक केले जात आहे. फसवणुकीच्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेत गर्भपाताला वैध ठरवण्याला मतदारांनी पाठिंबा द्यावा ! – बायडेन

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालय गर्भपाताला अवैध ठरवणारा त्याचा वर्ष १९७३ मधील निर्णय पालटू शकते, असा न्यायालयातील एक मसुदा फुटला आहे. न्यायालयानेही त्याचा या दृष्टीनेच विचार चालू असल्याचे अधिकृतरित्या घोषितही केले.

अमेरिका पुराणमतवादी होणार ?

स्वातंत्र्याला या संयमाचे आणि त्यागाचे कोंदण असल्यास कुठलीही कृती ही विवेकाला धरून होते. ‘अमेरिकेतील सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतन तेथील समाजधुरिणी रोखतील का ?’, हे ठाऊक नाही; मात्र भारतात तशी स्थिती उद्भवू नये; म्हणून आदर्श समाजरचनेविषयी नियम सांगणाऱ्या हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

नाशिकमधील सप्तशृंग गडावर बिअरचे दुकान थाटण्याचा प्रशासनाचा डाव रणरागिणींनी उधळला !

बिअरच्या दुकानासह मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवरील बंदीचाही ठराव संमत !

हिंसाचाराच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या महिला नेत्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हिंसाचार करणार्‍यांवर अशी कारवाई होणे आवश्यक !

बहुपत्नीत्व आणि सुधारणावाद !

लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी समान नागरी कायदा हा एक उत्तम उपाय असू शकतो. त्यामुळे या कायद्याला वेगवेगळ्या प्रकारे धर्मांध विरोध करत असतील, तर तो लवकरात लवकर अस्तित्वात येण्यासाठी हिंदूंनीही संघटित होऊन सरकारला तो आणण्यासाठी दबाव आणायला हवा.

जहाल नक्षलवादी नर्मदा हिचा कर्करोगामुळे भायखळा कारागृहात मृत्यू !

नर्मदा हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथील ‘दंडकारण्य बंद’ची घोषणा केली आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे ।’ अशी भित्तीपत्रके गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात लावण्यात आली आहेत.

हे पोलिसांना लज्जास्पद !

वर्ष २०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित राहिले. या दंगलीच्या वेळी जिहाद्यांकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला होता.

अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांचे २ सहस्र महिलांसमवेत हनुमान चालिसाचे पठण !

येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी २ सहस्र महिलांच्या समवेत १२ एप्रिल या दिवशी रवी नगर परिसरात हनुमान चालिसाचे पठण केले. तेथील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतातील राजकारणी असे कधी बोलू शकतात का ?

जर सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल, असे आश्वासन फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या महिला उमेदवार मरीन ली पेन यांनी दिले आहे.